स्वतःसाठी नाही तर देशासाठी खेळा! :अशोककुमार ध्यानचंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 01:39 AM2022-06-23T01:39:39+5:302022-06-23T01:40:55+5:30

प्रतिकूल परिस्थितीत देशासाठी आम्ही खेळ केला. आज खेळाडूंना अनेक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामळे त्यांनी स्वत:साठी, नाही तर देशासाठी खेळावे, असे आवाहन हॉकीचे जादूगार मानले जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांचे सुपूत्र आणि भारतीय ऑलिम्पिक हॉकी खेळाडू अशोककुमार ध्यानचंद यांनी बुधवारी (दि.२२) व्यक्त केले.

Play for the country, not for yourself! : Ashok Kumar Dhyanchand | स्वतःसाठी नाही तर देशासाठी खेळा! :अशोककुमार ध्यानचंद

स्वतःसाठी नाही तर देशासाठी खेळा! :अशोककुमार ध्यानचंद

Next
ठळक मुद्दे नाशिकमधील खेळाडू, आर्यनमॅन, प्रशिक्षकांचा सत्कार

नाशिक : प्रतिकूल परिस्थितीत देशासाठी आम्ही खेळ केला. आज खेळाडूंना अनेक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामळे त्यांनी स्वत:साठी, नाही तर देशासाठी खेळावे, असे आवाहन हॉकीचे जादूगार मानले जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांचे सुपूत्र आणि भारतीय ऑलिम्पिक हॉकी खेळाडू अशोककुमार ध्यानचंद यांनी बुधवारी (दि.२२) व्यक्त केले.

२३ जून हा जागतिक ऑलिम्पिक दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. ऑलिम्पिक दिनाच्या पूर्वसंध्येला ऊर्जा युवा प्रतिष्ठान व नाशिक क्रीडा संघटना यांच्या वतीने नाशिक शहरातील अंतरराष्ट्रीय आर्यनमॅन, आंतरराष्ट्रीय खेळाडू, पंच, प्रशिक्षक, क्रीडा मार्गदर्शक यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी (दि. २२) पंडित कॉलनीतील बाल गणेश फाऊंडेशन सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय ऑलिम्पिक हॉकी खेळाडू अशोककुमार ध्यानचंद उपस्थित होते.

त्यांचा सत्कार ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने ऊर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते व अश्फाक शेख, नंदकिशोर खैरनार यांच्या हस्ते करण्यात आला.

अशोककुमार ध्यानचंद यांनी हॉकीच्या तीन विश्वकपमध्ये भाग घेतला असून, १९७५ च्या विश्वकप जिकणाऱ्या टीमचे सदस्यदेखील होते. यावेळी ध्यानचंद यांनी आपले अनुभव सांगितले. आम्ही खेळत असलेल्या काळात कोणत्याही सुविधा नसताना देखील देशासाठी खेळायचे हे स्वप्न बाळगले होते आणि देशासाठी खेळलो. आता खेळाडूंसाठी सर्व क्रीडा सुविधा उपलब्ध आहे, खेळातील अचूक बारकावे ओळखून खेळाचे सर्व नियम आत्मसात करावे आणि देशासाठीच खेळावे, असे मत व्यक्त केले.

यावेळी अशोक दुधारे, अश्फाक शेख, नंदकिशोर खैरनार, हेमंत पाटील सर तसेच ऊर्जा प्रतिष्ठानचे दीपक हांडगे, आनंद फरताळे, प्रसन्ना तांबट, जगदीश शेजवळ, हर्षल पाटील, समीर देवघरे, कुणाल पोतदार, आदी उपस्थित होते.

Web Title: Play for the country, not for yourself! : Ashok Kumar Dhyanchand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.