प्लॅस्टिकच्या बाटल्यांची होडी
By Admin | Updated: August 18, 2016 23:34 IST2016-08-18T23:34:16+5:302016-08-18T23:34:17+5:30
प्लॅस्टिकच्या बाटल्यांची होडी

प्लॅस्टिकच्या बाटल्यांची होडी
त्र्यंबकेश्वर : गौतम तलावात युवकांनी केली सफरत्र्यंबकेश्वर : येथील हौशी युवकांनी पाण्याच्या प्लॅस्टिकच्या रिकाम्या टाकाऊ बाटल्या जमा करून त्याची होडी तयार केली. प्रयोग म्हणून येथील गौतम तलावात तब्बल आठ युवकांनी या होडीवर स्वार होत सफरही केली.
नगरसेवक ललित लोहगावकर आणि त्यांच्या ग्रुपमधील श्याम गोसावी, पिंटू नाईकवाडी, सचिन कदम, सतीश पवार, खंडू भोई, अमोल दोंदे, सतीश पवार, रमेश झोले, अविनाश शेटे, श्याम भुतडा आणि या सर्वांना प्रोत्साहन देणारे अॅड. पराग दीक्षित आदिंच्या ग्रुपपैकी कोणाच्या तरी डोक्यात ही शक्कल आली. ‘मिनरल वॉटरची बाटली बूच लावले की पाण्यातदेखील बुडत नाही. यावरून आपण या बाटल्यांपासून होडी बनविली तर..!’ आणि सर्व ग्रुप कामाला लागून रिकाम्या बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. इकडून तिकडून चांगल्या बाटल्या जमा होऊ लागल्या. यात अनेक हॉटेलमालकांनी चांगले सहकार्य करून सुमारे २५०० रिकाम्या व सुस्थितीतील झाकणाच्या बाटल्या जमा झाल्या व प्रत्यक्ष होडी तयारही करण्यात आली.
सायंकाळी चारच्या सुमारास होडी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या मागील बाजूकडील गौतम तलावाकडे आणण्यात आली आणि होडीची ट्रायल घेण्यात आली. एवढेच नव्हे तर तीत जवळपास ८ युवक बसून संपूर्ण गौतम तलावात यशस्वी चाचणी केली आणि चाचणी यशस्वी झाली! आता या होडीचा उपयोग गणेश विसर्जनासाठी करण्यात येणार असल्याचे लोहगावकर यांनी सांगितले.
ही कल्पना श्यामराव गोसावी यांच्या कल्पनेतून आली असल्याचेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)