Plastic Ban : प्लॅस्टिकबंदीमुळे बेरोजगारीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 06:33 IST2018-06-24T06:33:41+5:302018-06-24T06:33:50+5:30
उद्योजकांवर संकट : तीन हजार कुटुंबांसमोर रोजगाराचा प्रश्न

Plastic Ban : प्लॅस्टिकबंदीमुळे बेरोजगारीचे संकट
नाशिक : राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी जाहीर केल्यानंतर हजारो कुटुंबांसमोर बेरोजगारीचे संकट उभे ठाकले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नाशिकमध्ये सुमारे दोनशे उद्योग प्लॅस्टिकचा पुनर्वापर करीत प्लॅस्टिक पिशव्या तयार करतात; परंतु प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीमुळे या क्षेत्रातील कामगारांसह प्लॅस्टिक कचरा संकलित करून या उद्योगांना पुरविणाऱ्या हजारो कुटुंबीयांवरही बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे.
नाशिक औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसह जिल्हाभरातील विविध भागातून प्लॅस्टिक कचºयाचे संकलन करून त्यावर सुमारे तीन ते चार हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर अवलंबून होता. नाशिकमध्ये जवळपास ५०० प्लॅस्टिक उत्पादक उद्योग आहेत. त्यापैकी २०० उद्योग प्लॅस्टिक चा पुनर्वापर करून पिशव्या तयार करतात. प्लॅस्टिक बॅग उत्पादन हा सूक्ष्म आणि लघु उद्योग विभागात मोडणारा व्यवसाय असला तरी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात सुमारे ५०० ते ६०० कोटी रुपयांच्या प्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादन होत होते. तर नाशिकच्या बाजारपेठेत स्थानिक व बाहेरील उद्योजकांकडून येणाºया प्लॅस्टिक पिशव्यांसह जवळपास एक हजार कोटींची उलाढाल होत होती. त्यामुळे प्लॅस्टिकवर पुनर्प्रक्रिया करणाºया उद्योगांना शहर व परिसरातील प्लॅस्टिक कचरा संकलित करून विकणाºया हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह होत होता. परंतु, आता प्लॅस्टिक पिशव्यांच्या उत्पादन, विक्री व वापरावरच बंदी आल्याने या क्षेत्रात काम करणाºया सुमारे तीन ते चार हजार कुटुंबांसमोर रोजगाराचे संकट उभे ठाकले आहे.
प्रभावी कचरा व्यवस्थापनाचा उपाय
एकल पॉलिमरद्वारे बनविलेल्या प्लॅस्टिक पिशव्या टिकाऊ, पुन्हा वापरता येण्याजोग्या आणि किफायतशीर असतात. प्लॅस्टिक पिशव्या, किराणा मालासाठीच्या बॅग, किरकोळ बॅग, कचरा बॅग, झिपलॉक बॅग वगैरे प्रकारच्या पिशव्या न वापरणे फारच गैरसोयीचे ठरणार आहे. यासाठी सर्व नागरी स्थानिक संस्थांनी आपापल्या भागांतील कचºयाची पूर्ण विल्हेवाट लावणे व प्रभावी कचरा व्यवस्थापन करणे हाच यावर एकमेव उपाय असल्याची प्रतिक्रिया प्लॅस्टिक बॅग उत्पादकांकडून व्यक्त होत आहे.