Plantation of palkhed villagers in the pits | पालखेड ग्रामस्थांचे खड्ड्यात वृक्षारोपण

पिंपळगाव पालखेड रस्त्यावर वृक्षारोपण करताना बलुतेदार महासंघाचे निफाड उप तालुकाध्यक्ष प्रमोद सासवडे,प्रहार संघटनेचे निफाड तालुकाध्यक्ष राजू थेटे यांच्या सह ज्ञानेश्वर थेटे,विष्णू कराटे,महेश निकम,विकी गडाख,सोमनाथ डूकळे,राहुल गोसावी,सनी काळे,शेखर केदारे आदी.

ठळक मुद्देगांधीगिरी मार्गाने आंदोलन

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथील ग्रामस्थांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत खड्यात वृक्षारोपण केले व प्रशासनाच्या विरोधात रस्ता दुरुस्तीबाबत घोषणाबाजी केली.
पिंपळगाव बसवंत परिसरातील पालखेड-रानवड रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. खड्यांमुळे या रस्त्यावरून प्रवास करतांना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेतमालाची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना या रस्त्यामुळे मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
ºयासंदर्भात प्रहार संघटना आणि बारा बलुतेदार महासंघाच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि.१७) गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आले.
त्यांनी पालखेड-रानवड रस्त्यावरील खड्यात वृक्षारोपण केले व प्रशासनाविरोधात रस्ता त्वरीत दुरुस्त करावी अशी घोषणाबाजी केली.
यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे निफाड उप तालुकाध्यक्ष प्रमोद सासवडे,प्रहार संघटनेचे निफाड तालुकाध्यक्ष राजू थेटे यांच्या सह ज्ञानेश्वर थेटे,विष्णू कराटे,महेश निकम,विकी गडाख,सोमनाथ डूकळे,राहुल गोसावी,सनी काळे,शेखर केदारे ,सागर निर्भवणे ,विकास गोसावी,रवी भोगे,सोमनाथ खैरणार,चंदन थेटे,सत्यम थेटे,सौरभ सोनवणे,हृतिक काळे,दिनेश जगताप,ज्ञानेश्वर आहेर,नाना हिरे,कृष्णा शिंदे, आदी

पालखेड रानवड रस्त्याची परिस्थिती अशी झाली की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी गत झाली आहे.या रस्त्यावर वेळोवेळी विद्यार्थीचा अपघात झालेला आहे त्याचे प्रशासनाने गांभीर्य घेऊन रस्ता दुरु स्तीचे लवकरात लवकर काम चालु करावे अन्यथा या पेक्षाही तिव्र आंदोलन केले जाईल याची प्रशासनाने व स्थानिक लोकप्रतीनिधीने नोंद घ्यावी.
- प्रमोद सासवडे,
बारा बलुतेदार महासंघ, निफाड उप तालुकाध्यक्ष

लासलगाव व पिंपळगाव या मार्गावर रानवड कारखाना हे महत्वाचे गावे या मार्गावरूनअसल्याने मोठ्या प्रमाणात शेत मालाची वाहतूक या मार्गी केली जाते मात्र अध्यप या ठिकाणी कुठल्याही प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे कुठलेही काम केले नाही.
त्यामुळे खड्ड्यात गाडीचे नुकसान होऊन शेतमाल वाहतूक करणार्या शेतकरी वाहन चालकांना मोठ्या भुर्दंड सहन करावा लागत आहे

 

Web Title: Plantation of palkhed villagers in the pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.