ब्रह्मगिरी पहाड परिसरात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:13 IST2021-07-26T04:13:15+5:302021-07-26T04:13:15+5:30

सात वर्षांपासून ब्रह्मगिरी व परिसर प्रदूषणमुक्त करणारे त्यासाठी झटणारे ललितगुरू लोहगावकर व त्यांची आयपीएल टीम यांच्या माध्यमातून शंभर ...

Plantation in Brahmagiri hill area | ब्रह्मगिरी पहाड परिसरात वृक्षारोपण

ब्रह्मगिरी पहाड परिसरात वृक्षारोपण

सात वर्षांपासून ब्रह्मगिरी व परिसर प्रदूषणमुक्त करणारे त्यासाठी झटणारे ललितगुरू लोहगावकर व त्यांची आयपीएल टीम यांच्या माध्यमातून शंभर वृक्ष लावले जातील आणि त्यांची जोपासनाही होणार आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विक्रम नागरे आपल्या कुटुंबीयांसमवेत गुरू सागरानंद सरस्वती यांच्या दर्शनासाठी आले असताना, दर्शनाची कार्यक्रम आटोपल्यानंतर कै.सुदामदादा नागरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ब्रह्मगिरी पायथ्याशी ब्रह्मसावित्री मंदिराजवळ विक्रम नागरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, स.पो.नि. शिवचरण पांढरे, लालित लोहगावकर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून १०० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी बाळकृष्ण भानुदास देव, डॉ.पंकज शास्त्री घेवारे, सिन्नर, हभप श्रीरंग महाराज कवडकर, सुभाष घेवारे, गौरव पवार, कैलास देशमुख, प्रकाश रणमाळे, आनंद मोंढे, भाऊसाहेब पोरजे, संजय गांगुर्डे, वनपाल मंगेश शेळके आदी उपस्थित होते.

Web Title: Plantation in Brahmagiri hill area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.