पाटोदा परिसरात छत्रपती सेनेतर्फे झाडे लावा, ऑक्सिजन वाढवा मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 11:19 PM2021-06-15T23:19:24+5:302021-06-16T00:36:26+5:30

पाटोदा : कोरोना काळात ऑक्सिजनअभावी मृत्यू पावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यभरात छत्रपती सेनेतर्फे अनोख्या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. ऑक्सिजनअभावी जीव गमविण्याची वेळ कोणावर येऊ नये यासाठी राज्यात ५१ हजार वृक्षांची लागवड छत्रपती सेनेच्या माध्यमातून करण्याचा संकल्प संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार यांनी केला आहे.

Plant trees in Patoda area by Chhatrapati Sena, increase oxygen campaign | पाटोदा परिसरात छत्रपती सेनेतर्फे झाडे लावा, ऑक्सिजन वाढवा मोहीम

पाटोदा येथील जनता विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपणप्रसंगी बी. एच. जाधव, गोरख पवार, प्रताप पाचपुते, गणेश बैरागी, एन. ए. दाभाडे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्दे राज्यभरात ५१ हजार वृक्षलागवडीचा संकल्प

पाटोदा : कोरोना काळात ऑक्सिजनअभावी मृत्यू पावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यभरात छत्रपती सेनेतर्फे अनोख्या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. ऑक्सिजनअभावी जीव गमविण्याची वेळ कोणावर येऊ नये यासाठी राज्यात ५१ हजार वृक्षांची लागवड छत्रपती सेनेच्या माध्यमातून करण्याचा संकल्प संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार यांनी केला आहे.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे राज्यातील अनेक ठिकाणी कोरोना उपचारादरम्यान रुग्णांना प्राण गमवावे लागले. कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाली. त्या कुटुंबाची उणीव आपण भरून काढू शकत नाही. मात्र भविष्यात प्रत्येकास ऑक्सिजन पुरविणाऱ्या वृक्षांचे महत्व पटवून देण्यासाठी व पुन्हा आपल्यावर अशी वेळ येऊ नये यासाठी छत्रपती सेनेतर्फे राज्याच्या विविध जिल्ह्यांत सुमारे ५१ हजार वृक्षांचे रोपण सेनेच्या जिल्हा, तालुका व ग्रामीण पदाधिकाऱ्यांमार्फत केले जात आहे. पावसाळ्यात वृक्षारोपण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते हे शाळा, डोंगर, वनविभाग असे जेथे जागा मिळेल तेथे वृक्षारोपण करून संकल्प पूर्ण करीत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विष्णू महाराज मेधने यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा येथील जनता विद्यालय शाळेच्या आवारात विविध प्रकारच्या ५१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी मनमाड वनविभागाचे वनपाल बी. एच. जाधव, वैष्णवी पैठणीचे संचालक गोरख पवार, पाटोदा गावचे सरपंच प्रताप पाचपुते, ग्रामपंचायत सदस्य गणेश बैरागी, जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. ए. दाभाडे, नेहरू युवा केंद्र युवा राष्ट्रीय स्वयंसेवक महेश शेटे, छत्रपती सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णू महाराज मेधने, तालुकाध्यक्ष सुनील पानसरे, नांदगाव तालुकाध्यक्ष रंगनाथ शेळके आदींसह छत्रपती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून वृक्षारोपण केले.

 

Web Title: Plant trees in Patoda area by Chhatrapati Sena, increase oxygen campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.