त्र्यंबक पोलिसांकडून श्रावणाच्या पार्श्वभूमीवर नियोजनत्
By Admin | Updated: July 24, 2014 00:56 IST2014-07-23T23:08:25+5:302014-07-24T00:56:50+5:30
त्र्यंबक पोलिसांकडून श्रावणाच्या पार्श्वभूमीवर नियोजनत्

त्र्यंबक पोलिसांकडून श्रावणाच्या पार्श्वभूमीवर नियोजनत्
र्यंबकेश्वर : संपूर्ण श्रावण महिना, त्यात सोमवारच्या दिवशी होणाऱ्या विशेष गर्दीच्या पार्श्वभूमीवर आज त्र्यंबक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी पोलीस ठाण्यात बैठकीचे आयोजन केले होते.
बैठकीस नगराध्यक्ष यशोदा अडसरे, निवासी नायब तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, पुरोहित संघाचे अध्यक्ष जयंत शिखरे, सहायक पोलीस निरीक्षक सुनील तावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश पाटील, वीज वितरणचे स्थानिक अभियंता मंगेश प्रजापती, माजी नगराध्यक्ष योगेश तुंगार, सुनील अडसरे, विद्यमान उपनगराध्यक्ष ललित लोहगावकर, ज्येष्ठ नागरिक मधुकर हांडे, रिपाइं तालुका अध्यक्ष शांताराम बागुल, उल्हास आराधी, अनघा पुरके आदि उपस्थित होते.
यावेळी खातेनिहाय प्रत्येक विभागाच्या प्रमुखांनी केलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. त्र्यंबक नगरपालिकेचा नियोजन आराखडा सांगताना अभियंता जुन्नरे म्हणाले, कर्मचारी संप सुरू असला तरी ठेकेदारी कर्मचाऱ्यांमार्फत सफाईची कामे करून पाणीपुरवठा सुरळीत राहण्यास कर्मचाऱ्यांना विनंती करून पाणीपुरवठ्याचे काम केले जाईल.
त्र्यंबकेश्वर देवस्थानकडून मुख्य कार्यकारी अधिकारी राजाभाऊ जोशी व देवस्थान विश्वस्त जयंत शिखरे म्हणाले, मंदिराचे चारही दरवाजे उघडे राहणार असून, यात्रिक, भाविकांना प्रवेश पूर्व दरवाजाने मिळेल. त्यासाठी भव्य शामियाना उभारून पावसापासून संरक्षण करता येईल. तथापि, या ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्यांबरोबरच पोलीस बंदोबस्ताची मागणी केली.
पश्चिम दरवाजाने स्थानिक ग्रामस्थांना प्रवेश मिळेल. मात्र देवस्थानने निश्चित केलेल्या वेळेतच यावे. यावर उपस्थितांनी गावकऱ्यांना केव्हाही दर्शन मिळण्याची मागणी केली. अर्थात त्यावर निर्णय विश्वस्थ मंडळापुढे प्रस्ताव ठेवण्यात येईल, असे सांगण्यात आले.
वीज मंडळाचे अभियंता म्हणाले, भार नियमन होणार नाही. जादा कर्मचारी बोलावून वीज यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. परिवहन महामंडळाचे स्थानिक नियंत्रक सोनवणे म्हणाले, चारही सोमवारी व दररोजच्या गर्दीसाठी गाड्यांचे नियोजन केले असून, बसेस कमीपडू देणार नसल्याची हमी दिली.
मेळा स्थानकाची साफसफाई करावी, पिण्याचे पाण्याची सोय, विद्युत व्यवस्था, शौचालयाची सोय व स्थानकातील खड्डे बुजवावेत. तसेच नियमित स्थानकातदेखील सुविधा देण्याची मागणी करण्यात आली. ग्रामस्थांनी उपयुक्त सूचना बैठकीत मांडल्या. पोलीसांतर्फे या काळात पुरेसा बंदोबस्त लावला जाईल, त्यासाठी विविध दिवशी गर्दीच्या वेळेस पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, गर्दीच्या वेळेस स्थानिकांना सोडण्यासाठी स्थानिक पोलीस तैनात असावेत त्यासाठी ओळखीचेच कर्मचारी असावे. त्र्यंबकेश्वर शहरातून थेट विश्रामगृहापर्यंत रस्त्याच्या मधोमध दुभाजक लावून जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी मार्ग करावेत. जेणेकरून गर्दीचे नियोजन होईल आदि सूचना केल्या. तथापि उपविभागीय अधिकारी महेश पाटील म्हणाले, आता बॅरिकेटींग लावण्याची आवश्यकता नाही. रस्ता चौपदरी झाल्यामुळे तशी गरज भासणार नाही.
यावेळी उल्हास आराधी, भूषण अडसरे, भूषण गंगापुत्र, मनोज काण्णव, देवस्थान सिक्युरिटी अधिकारी अमित टोकेर, शामराव गंगापुत्र, माधुरी जोशी, विष्णु दोबाडे, नार्वेकर आदि उपस्थित
होते. (वार्ताहर)