नाशिकरोड येथे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी नियोजन

By Admin | Updated: August 9, 2015 00:27 IST2015-08-09T00:26:18+5:302015-08-09T00:27:19+5:30

नाशिकरोड येथे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी नियोजन

Planning for the safety of devotees at Nashik Road | नाशिकरोड येथे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी नियोजन

नाशिकरोड येथे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी नियोजन

नाशिकरोड : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकरोड रेल्वेस्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या असून, रेल्वेचे अतिरिक्त मुख्य सुरक्षा आयुक्त प्रणवकुमार यांनी स्थानकावर पाहणी दौरा केला.
शनिवारी दुपारी रेल्वेचे अतिरिक्त मुख्य सुरक्षा आयुक्त प्रणवकुमार, वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त राजेंद्र रूपनवार, आलोक बोहरा आदि अधिकाऱ्यांनी प्रथम रेल्वेस्थानकावरील कार्यालय स्टेशन प्रबंधक एम. बी. सक्सेना व इतर अधिकाऱ्यांसमवेत स्थानकावरील सुरक्षतेबाबत चर्चा केली. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्थानिक अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून रेल्वेस्थानकावर येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांना कशा प्रकारे बाहेर सुरक्षित काढता येईल, अंदाजित किती भाविक या काळात येतील, त्यांच्या सुरक्षितेचे कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे, बंदोबस्तासाठी आलेल्या अतिरिक्त रेल्वे बलाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची, खाण्यापिण्याचे नियोजन कशा पद्धतीने करण्यात आले आदिंबाबत माहिती घेतली. यावेळी रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक बी. डी. इप्पर, शकील खान आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Planning for the safety of devotees at Nashik Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.