प्रलंबित कृषिपंप जोडणीसाठी नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:04 IST2018-06-25T00:03:51+5:302018-06-25T00:04:08+5:30
पैसे भरूनही कृषिपंपाची वीजजोडणी प्रलंबित असलेल्या नाशिक परिमंडळातील सुमारे ३० हजार शेतकऱ्यांना लवकरच उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे (हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टीम) वीजजोडणी देण्यात येणार आहे.

प्रलंबित कृषिपंप जोडणीसाठी नियोजन
नाशिक : पैसे भरूनही कृषिपंपाची वीजजोडणी प्रलंबित असलेल्या नाशिक परिमंडळातील सुमारे ३० हजार शेतकऱ्यांना लवकरच उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे (हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टीम) वीजजोडणी देण्यात येणार आहे. पुढील दोन महिन्यांत शेतक-यांसाठी असलेली ही योजना कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. यासाठीची निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी या कामांना गती देण्याच्या सूचना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर परिमंडळ कार्यालयात आयोजित अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांच्या बैठकीत ब्रिजपालसिंह जनवीर यांनी योजनेबाबतची माहिती दिली. मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून वीजजोडणी प्रलंबित असलेल्या राज्यभरातील अडीच लाख शेतीपंपांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे जोडणी देण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेतून होणाºया कामांचा नाशिक परिमंडळातील २९ हजार ९४१ शेतकºयांना थेट फायदा होणार आहे. तर परिसरातील इतर शेतकºयांनाही योजनेतून होणाºया कामांचा लाभ मिळेल. योजनेत एक किंवा दोन कृषिपंप वीजजोडणीसाठी १०, १६ किंवा २५ किलोवोल्टचे स्वतंत्र रोहित्र उभारण्यात येणार असल्याने वीजगळती व चोरीला आळा बसेल. उपलब्ध मनुष्यबळाचा सुयोग्य वापर करून आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी व उपविभागनिहाय निविदा त्वरित काढाव्यात, असे आदेश मुख्य अभियंत्यांनी दिल्या. या योजनेतून परिमंडळात जवळपास ७०० कोटी रुपयांची कामे होणार असून, एका जोडणीसाठी २ लाख ५० हजार रु पयांपर्यंतच्या खर्चाची तरतूद असून १४ वीज उपकेंद्रांची उभारणीही प्रस्तावित असल्याची माहिती मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी दिली. यावेळी नाशिक शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनील पावडे, मालेगाव मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता दरवडे, अहमदनगर मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता जीवन चव्हाण यांच्यासह सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
अन्यथा कारवाई
वीजबिलाची शंभर टक्के वसुली, वीजचोरी विरोधात कारवाई, थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडणे, नादुरु स्त मीटर बदलणे आदी कामे प्राधान्याने करावीत. या कामांबाबत लक्ष्य निर्धारित करून उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य उपयोग करावा. या कामांमध्ये कुचराई करणाºयां-विरु द्ध कारवाई करावी, अन्यथा स्वत: कारवाईस तयार राहावे, असा इशारा मुख्य अभियंत्यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिला.