ठिकाण प्रवचनाचे नाही, की लग्नमंडपातील...

By Admin | Updated: July 31, 2014 00:53 IST2014-07-31T00:34:48+5:302014-07-31T00:53:11+5:30

ठिकाण प्रवचनाचे नाही, की लग्नमंडपातील...

Place is not a sermon, or a wedding ... | ठिकाण प्रवचनाचे नाही, की लग्नमंडपातील...

ठिकाण प्रवचनाचे नाही, की लग्नमंडपातील...

लातूर : मराठी भाषिकांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेचा बुधवारी अखिल भारतीय छावा संघटनने निषेध नोंदविला़ राजीव गांधी चौकात कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे कार्यकर्त्यांनी दहन केले़
कर्नाटक पोलिसांनी येळ्ळूर या फलकावरुन मराठी भाषिकांना बेदम मारहाण केली़ या घटनेचा अखिल भारतीय छावा संघटनेने कर्नाटक शासनाच्या पुतळयाचे दहन करुन निषेध केला़ आंदोलनात कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे, विजयकुमार घाडगे पाटील, अ‍ॅड़ गणेश गोमचाळे, संजय राठोड , सिदाजी जगताप, बाळासाहेब जाधव, दीपक नरवडे, बालाजी निकम, राजू नरके, रघू पवार, निलेश बाजुळगे, ऋषिकेश सूर्यवंशी, किरण पाटील, रवि मिरकले सहभागी होते़
सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांना अमानुषपणे झालेल्या मारहाणीचा महाराष्ट्र आर्यन सेनेच्या वतीनेही बुधवारी लातुरात निषेध करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता गांधी चौकात निदर्शनेही करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष अविनाश निंबाळकर यांनी सांगितले़

Web Title: Place is not a sermon, or a wedding ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.