पिंपळगाव बसवंतला साडेपाच लाखांचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:44 IST2017-09-20T00:38:33+5:302017-09-20T00:44:16+5:30
पिंपळगाव बसवंतला साडेपाच लाखांचा गुटखा जप्त नाशिक : राज्यात विक्रीसाठी बंदी असताना अवैधरीत्या गुटख्याची विक्री करणाºया व्यापाºयास ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी (दि़ १८) अटक केली़ संशयित अविनाश बाळकृष्ण भामरे (३०, रा. व्यंकटेश रो-हाउस, एनडीसीसी कॉलनी, चिंचखेडरोड, पिंपळगाव बसवंत) असे या व्यापाºयाचे नाव असून, त्याच्याकडून ५ लाख ५५ हजार १७८ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

पिंपळगाव बसवंतला साडेपाच लाखांचा गुटखा
नाशिक : राज्यात विक्रीसाठी बंदी असताना अवैधरीत्या गुटख्याची विक्री करणाºया व्यापाºयास ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी (दि़ १८) अटक केली़ संशयित अविनाश बाळकृष्ण भामरे (३०, रा. व्यंकटेश रो-हाउस, एनडीसीसी कॉलनी, चिंचखेडरोड, पिंपळगाव बसवंत) असे या व्यापाºयाचे नाव असून, त्याच्याकडून ५ लाख ५५ हजार १७८ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू विक्री साठवणूक व वाहतुकीस प्रतिबंध आहे़ ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलिसांंच्या विशेष पथकाने पिंपळगाव बसवंत परिसरात अवैधरीत्या गुटखा विक्री करणाºया अविनाश भामरे यांच्या घरावर छापा टाकला. त्यांनी घरासमोरील मारुती ओमिनी कारमध्ये (एम.एच.१५, सी.डी.२४०१) गुटखा, पानमसाला व तंबाखूचा अवैधसाठा केला होता़ तसेच हा गुटखा ते विक्रीसाठी घेऊन जात असताना पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले़
पोलिसांनी पकडलेल्या या कारमध्ये विमल केसर, वाह पानमसाला, राज कोल्हापुरी, डब्ल्यू तंबाखू व राज रॉरल जाफरानी जर्दा अशा विविध कंपन्यांचा एकूण ५ लाख ५५ हजार १७८ रूपयांचा अवैध गुटखा व पानमसाला होता़ हा गुटखा अन्न व औषध प्रशासनाकडे देण्यात आला आहे़ विशेष पोलीस पथकातील सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, कर्मचारी चेतन मोरे, निवृत्ती काळे, नितीन महेर, अमोल दर्वे यांनी ही कारवाई केली.