जियाउद्दीन डेपो रस्त्यावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:27 IST2020-12-03T04:27:10+5:302020-12-03T04:27:10+5:30

सिंधी कॉलनीतील गतिरोधक धोकादायक उपनगर : उपनगर काॅलनी रस्त्यावर टाकण्यात आलेले गतिरोधक उंच असल्यामुळे वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहेत. या ...

Pits on Ziauddin Depot Road | जियाउद्दीन डेपो रस्त्यावर खड्डे

जियाउद्दीन डेपो रस्त्यावर खड्डे

सिंधी कॉलनीतील गतिरोधक धोकादायक

उपनगर : उपनगर काॅलनी रस्त्यावर टाकण्यात आलेले गतिरोधक उंच असल्यामुळे वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहेत. या मार्गावर गतिरोधकाची आवश्यकता असली तरी नियमानुसार गतिरोधक तयार करण्यात आलेले नसल्याने सुरक्षितेसाठी असलेले गतिरोधक धोकादायक ठरू पाहत आहे.

नाशिक, निमाणी आगारात खड्डेच खड्डे

पंचवटी : नाशिक आगार एक आणि पंचवटी येथील निमाणी बसस्थानकातील मार्गावर खड्डे पडले असून, त्यामध्ये पाणी साठत असल्याने डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. स्थानकात अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असून, खड्डे बुजविण्याची आवश्यकता आहे. सध्या पूर्ण क्षमतेने बसेस सुरू नसल्याने खड्डे बुजविण्याची मोहीम सुरू करण्याची गरज आहे.

घरकुलातील घरांचे ताबे गहाण प्रकार

इंदिरानगर : वडाळा गावातील घरकुल योजनेतील सुमारे पन्नास टक्के घरे लाभार्थींनी ताबे गहाण ठेवली आहेत, असे तेथे वास्तव्य करणाऱ्या काही लाभार्थींनी सांगितले. ज्या ठिकाणाहून झोपडपट्टी उठवण्यात आली त्या ठिकाणी कुंपण करण्यात आले नाही त्यामुळे शहर झोपडपट्टीमुक्त कसे होणार आणि स्मार्ट सिटी कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Pits on Ziauddin Depot Road