विंचूर-प्रकाशा महामार्गावर खड्डे बुजविण्यास सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 17:38 IST2019-12-11T17:37:14+5:302019-12-11T17:38:20+5:30
औदाणे : (ता. बागलाण) येथील गांवा जवळील विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर मोठे खड्डे पडल्याने रात्री वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने छोटे मोठे अपघात होऊन वाहनधारक जखमी होऊन वाहनांचे नुकसान होत होते सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यास सुरवात केल्याने वाहन चालक समाधान व्यक्त करीत आहेत.

औदाणे गावाजवळील महामार्गावर पडलेले खड्डे बुजविताना बांधकाम विभागाचे कामगार.
औदाणे : (ता. बागलाण) येथील गांवा जवळील विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर मोठे खड्डे पडल्याने रात्री वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने छोटे मोठे अपघात होऊन वाहनधारक जखमी होऊन वाहनांचे नुकसान होत होते सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यास सुरवात केल्याने वाहन चालक समाधान व्यक्त करीत आहेत.
या महामार्गावर वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ असून जड वाहनांची वाहतुकही मोठ्या प्रमाणात चालते, यामुळे रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडुन रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे या राज्य महामार्गावर अनेकांचा आपले जीव भमवावे लागले असल्याने प्रवाशांना वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. तर खड्यांमुळे अनेकांना अपंगत्व देखिल आले आहे.
या महामार्गावरील दररोज हजारो वाहने ये-जा करतात. हा मार्ग गुजरातला जाण्यासाठी अतिशय जवळच असुन नाशिकहुन सुरत येथेही जाण्यासाठी जवळचा असून, आहे माठी अवजड वाहने हयाच महामार्गावरून जातात. महामार्गावरील खड्डे टाळावे कसे असा प्रश्न वाहनचालकांना पडत होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन या रस्त्याच्या दुरु स्तीकडे दुर्लक्ष होत होते व लोकप्रतिनिधी व अधिकारी याकडे डोळे झाक करीत असल्याचे चित्र दिसुन येत होते. या महामार्गावरील व गावाजवळील रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी वाहनधारक व नागरिकांनी केली होती व खड्डे बुजविण्यास सुरवात झाल्याने वाहनचालक व प्रवाशांकडून समाथान व्यक्त केले जात आहे.
ह्या गावाजवळील महामार्गवर मोठ मोठे खड्डे पडले होते. अनेक वाहनधारक त्यामुळे जखमी व्हावे लागले आहे. सदर रस्ता ओलांडतना विद्यार्था व प्रवाशांना जीव मुठीत धरुन रस्ता ओलांडावा लागत होता. वाहनांची वर्दळ मोठी असुन बांधकाम विभागाने वेळोवेळी खड्डे बुजविणे गरजचे आहे.
- यशोधन निकम, नागरिक.