आंबोली फाटा-वेळुंजे रस्त्यावर खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST2021-07-19T04:11:08+5:302021-07-19T04:11:08+5:30
अंबोली फाटा ते वाघेरापर्यंत रस्ता मंजूर झाला असून वाघेरा ते गोरठाण शिवारापर्यंत रस्ता झाला आहे. परंतु वेळुंजे ते जव्हार ...

आंबोली फाटा-वेळुंजे रस्त्यावर खड्डेच खड्डे
अंबोली फाटा ते वाघेरापर्यंत रस्ता मंजूर झाला असून वाघेरा ते गोरठाण शिवारापर्यंत रस्ता झाला आहे. परंतु वेळुंजे ते जव्हार फाटा हा रस्ता ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे अडून राहिला आहे. त्याचा प्रवासी व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने ठेकेदार मनमानी करत असल्याचा आरोप होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जोपर्यंत हा रस्ता होत नाही तोपर्यंत किमान खड्डे तरी भरावे, अशी मागणी होत आहे.
या आठ किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजणे मुश्कील होत आहे. दळणवळणाच्या दृष्टीने हरसूल भागातून तालुक्याला जोडणारा एकमेव पर्यायी रस्ता आहे. जेमतेम दहा किमी अंतर पार करताना वाहनधारकास तारेवरची कसरत करावी लागते आहे तर ऐन पावसाळ्यात खड्डे न भरल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कोट...
मागील दोन ते तीन वर्षांपासून नुसते खड्डे भरण्याचे काम चालू आहे. अनेकदा ये-जा करत असताना या रस्त्यावर कित्येक अपघात झाले आहेत. हा रस्ता मंजूर झाला असताना ठेकेदार मनमानी करत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच कार्यवाही करावी.
- नवनाथ कोठुळे, तालुकाध्यक्ष मनसे
फोटो- १८ आंबोली रोड
180721\18nsk_26_18072021_13.jpg
फोटो- १८ आंबोली रोड