पिंपळणारे ते गोहरण रस्ता बंद
By Admin | Updated: September 14, 2015 22:28 IST2015-09-14T22:26:11+5:302015-09-14T22:28:34+5:30
वडनेरभैरव : वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय

पिंपळणारे ते गोहरण रस्ता बंद
वडनेरभैरव : चांदवड तालुक्यातील करवाडी येथील पिंपळणारे ते गोहरण रस्ता काही अज्ञात इसमांनी रविवारी अचानक नांगरल्याने गोहरण रस्ता बंद झाला आहे.
करवाडी येथील वस्ती शाळेत सुमारे दोनशे विद्यार्थी शिक्षण घेतात. रस्ता बंद झाल्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना शाळेत असे जायचे असा प्रश्न पडला आहे. पिंपळणारे शिवारातील गट नंबर १७२ मध्ये पिंपळणारे ते गोहरण रस्ता आहे. नकाशावर सरकारी रस्ता असून, हा रस्ता अचानक बंद केल्याने पिंपळणारे परिसरातील शेतकऱ्यांचा संपर्क तुटला आहे.
परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात कसा न्यावा असा प्रश्न पडला आहे. विद्यार्थी, दुधवाले, भाजीविक्रीवाले हे दररोज या मार्गाने ये-जा करतात. रस्ता बंद झाल्यामुळे शेती करायची कशी, शेतमाल बाजारात विक्रीसाठी न्यायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
पिंपळणारे ते गोहरण रस्ता पूर्ववत करावा, यासाठी उपसरपंच अनिल कोठुळे, पोलीसपाटील नवनाथ पाटील, महेंद्रसिंग परदेशी, बाळासाहेब कोठुळे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश यशवंते, सुनील
पवार, एकनाथ अहेर, संजय
पवार, सीताराम गांगुर्डे, नंदकिशोर गांगुर्डे, पुंजाराम अहेर, रामदास चव्हाण, भाऊसाहेब धनाईत, राजाराम पवार, संजय गांगुर्डे, विष्णू अहेर, सुभाष अहेर, पंडित गागुंर्डे, शरद पाचोरकर, डॉ. प्रदीपसिंग परदेशी, दिनकर पवार, अशोक अहेर, विजय पवार, अर्जुन पवार, दौलत निकम आदि शेतकऱ्यांनी चांदवड येथे जाऊन प्रांताधिकारी
भीमराज दराडे, तहसीलदार मनोज देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले.
याबाबत प्रांताधिकारी दराडे यांनी येत्या दोन ते तीन दिवसांत रस्ता कोणी व कशासाठी बंद
केला, याची तहसीलदारामार्फत चौकशी करून निर्णय घेऊ,
असे आश्वासन दिले. (वार्ताहर)