ढोकेश्वर सोसायटी छाप्यात पिस्तूल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:13 IST2017-09-11T00:13:20+5:302017-09-11T00:13:31+5:30
येथील ढोकेश्वर मल्टिस्टेट सोसायटीमधून ठेवीचे पैसे मिळत नसल्याच्या तक्र ारीवरून जिल्ह्यातील नऊ शाखांसह चेअरमन यांच्या राहत्या घरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात महत्त्वाच्या कागदपत्रांसह हार्ड डिस्क, पिस्तूल, ३५ काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, पोलिसांचे पथक संस्थापक काळे यांचा शोध घेत असल्याचे लासलगाव पोलिसांनी सांगितले.

ढोकेश्वर सोसायटी छाप्यात पिस्तूल जप्त
लासलगाव : येथील ढोकेश्वर मल्टिस्टेट सोसायटीमधून ठेवीचे पैसे मिळत नसल्याच्या तक्र ारीवरून जिल्ह्यातील नऊ शाखांसह चेअरमन यांच्या राहत्या घरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात महत्त्वाच्या कागदपत्रांसह हार्ड डिस्क, पिस्तूल, ३५ काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, पोलिसांचे पथक संस्थापक काळे यांचा शोध घेत असल्याचे लासलगाव पोलिसांनी सांगितले.
सतीश काळे यांनी सुरु वातीला हरिओम ग्रुपची स्थापना करत प्लॉट खरेदी-विक्र ीचे व्यवहार सुरू केले होते. त्यानंतर सोसायटीची स्थापना करून युवकांकडून नोकरी लावून देण्यासाठी ठरावीक रक्कम घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नोकरी मिळेल या आशेने अनेक युवक त्याच्या आमिषाला बळी पडले; मात्र फसवणूक झाल्याने समजताच युवकांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार शनिवारी सोसायटीवर छापे टाकण्यात आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सतीश काळे अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्नात असल्याचे सांगण्यात येते.