शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भोंदूबाबा कॅप्टन खरातच्या फार्महाउसमधून पिस्तूल जप्त; झडतीत आणखी आक्षेपार्ह व्हिडीओ पोलिसांच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 07:09 IST

मालमत्तांची होणार चौकशी; तपास ‘एसआयटी’कडे...

नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासासाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. पुणे येथील पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते (आयपीएस) यांच्याकडे एसआयटीप्रमुख म्हणून तपासाची सूत्रे असतील. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे असलेल्या खरातच्या फार्महाउसमधून पोलिसांनी पिस्तूल जप्त केले आहे. तसेच झडतीत आणखी काही आक्षेपार्ह व्हिडीओसुद्धा हाती लागल्याचे समजते. 

खरातला त्याचा एकेकाळचा नोकरच ब्लॅकमेल करीत असल्याचा संशय गडद झाल्याने घटनेतील गुंतागुंत वाढली आहे. या घटनेचे धागेदाेरे शिर्डी येथील एका प्रकरणाशी जोडले जात आहेत. शिर्डी परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने आपले एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील फोटो तयार करत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी खरातकडे नोकरीला असलेल्या नीरज जाधव याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. 

नोकराकडूनच कॅप्टनला ब्लॅकमेलची धमकी?नीरज जाधव हा खरातकडे ऑफिसबॉय होता. शिर्डी येथील तक्रारदार तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे तीन वर्षांपूर्वी नाशिक येथे खरात याच्या कार्यालयात नीरजशी तिची ओळख झाली.या ओळखीचा गैरफायदा घेऊन जाधव पीडित महिलेला बनावट अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. नंतर हाच जाधव खरात यालाही ब्लॅकमेल करीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. 

तपासात आता पुढे काय?‘एसआयटी’कडे तपासाची सूत्रे आल्यानंतर डिजिटल फॉरेन्सिक तपासाचा आधार घेतला जाणार असून, पोलिसांच्या हाती लागलेल्या ५८ व्हिडीओंमधील पीडितांना न्याय देण्यावर भर असेल. फोन कॉल्स तपासणे, तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे कामसुद्धा सुरू करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहार, नेटवर्क तपास, संभाव्य सहकारी आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. याशिवाय कॅप्टन खरात याचे आर्थिक सोर्स तपासून इतकी अमाप माया त्याने कशी जमविली, याचे सखोल विश्लेषण केले जाणार आहे. 

कॅप्टन अशोक खरात २०० कोटींचा मालकअशोक खरात याने राजकीय मंडळी, प्रशासनातील बडे अधिकारी, तसेच सेलेब्रिटी यांना जाळ्यात ओढून अमाप माया जमविली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.नाशिक शहर, तसेच सिन्नर येथील आलिशान बंगले, मीरगाव (ता. सिन्नर) येथे आलिशान फार्महाउस, याशिवाय अनेक जमिनी, स्वतः तसेच कुटुंबीयांच्या नावे आहेत. 

सोने, चांदी अन् मौल्यवान वस्तू, दोन महागड्या कार अशा एकूण तब्बल २०० कोटींच्या संपत्तीचा मालक खरात हाच असल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस