मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामदैवत पीरसाहेब यांचा यात्रोत्सव उत्साहात साजरा झाला. पहिल्या दिवशी सकाळी संदल मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर देवतेचा विधिवत अभिषेक करण्यात आला. दुपारी गावातील देवभक्त प्रकाश हिरे यांनी बारागाड्या ओढल्यात, रात्री लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले. दुसर्या दिवशी विराट कुस्त्यांची दंगल संपन्न झाली. यावेळी जिल्ातील असंख्य मल्लांनी हजेरी लावली. लोकवर्गणीतून दरवर्षी यात्रोत्सव साजरा केला जातो. यात्रोत्सव यशस्वीतेसाठी सरपंच शोभा सावंत, उपसरपंच रमेश सावंत, माजी सरपंच मोठाभाऊ सावंत, लालजी सावंत, भाऊसाहेब सावंत, दीपक सावंत, दयाराम सावंत, शंकर सावंत, भरत सावंत, सुकदेव हिरे, बापू सावंत, किसन पानसरे, भगवान सावंत, विलास नहिरे आदिंनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
पीरसाहेब यात्रोत्सव डोंगरगाव येथे उत्साहात
By admin | Updated: May 7, 2014 21:34 IST