पिंपळगावी युवकाचा बुडून मृत्यू
By Admin | Updated: March 7, 2017 23:13 IST2017-03-07T23:13:17+5:302017-03-07T23:13:32+5:30
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत येथील सूरज कन्हैयालाल गुप्ता (१७) याचा मृतदेह कादवा नदीपात्रात सापडला.

पिंपळगावी युवकाचा बुडून मृत्यू
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत येथील सूरज कन्हैयालाल गुप्ता (१७) याचा मृतदेह कादवा नदीपात्रात सापडला.
येथील बांधकाम ठेकेदार कन्हैयालाल छोटू गुप्ता यांचा भीमाशंकर इंग्लिश स्कूलमध्ये दहावीत शिकणारा मुलगा सोमवारी (दि. ६) दुपारी ४ वाजता घरातून शाळेचे परीक्षेचे हॉल तिकीट आणण्यासाठी गेला होता. परंतु सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने रात्रभर त्याची शोधाशोध केली. तो मिळून आला नाही. मंगळवारी (दि. ७) दुपारी ३ वाजता कादवा नदीत शिरसगाव रोड येथे त्याचे कपडे दिसल्याने शंका वाढली. अग्निशामक दलाच्या मदतीने शोधकार्य सुरू केले असता त्याचा मृतदेह आढळून आला. या बाबतीत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मित्रासोबत नदीवर पोहाण्यासाठी गेला असता पाण्यात अंदाज न आल्याने सदर घटना घडल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे. सूरज कन्हैयालाल यांचा एकुलता एक मुलगा होता.
त्याला लहान तीन बहिणी आहेत. (वार्ताहर)