पिंप्री त्र्यंबकला घरफोडी; एक लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:20 IST2021-08-17T04:20:34+5:302021-08-17T04:20:34+5:30

घरात एका लहान मुलीशिवाय कोणी नसल्याचे पाहून एका अज्ञात इसमाने घरात प्रवेश केला. त्या लहान मुलीला ‘मी तुझा मामा ...

Pimpri Trimbakala burglary; Lampas looted one lakh | पिंप्री त्र्यंबकला घरफोडी; एक लाखाचा ऐवज लंपास

पिंप्री त्र्यंबकला घरफोडी; एक लाखाचा ऐवज लंपास

घरात एका लहान मुलीशिवाय कोणी नसल्याचे पाहून एका अज्ञात इसमाने घरात प्रवेश केला. त्या लहान मुलीला ‘मी तुझा मामा आहे. तुझ्या वडिलांनी मला घरातून ५० रुपये घेण्यास सांगितले,’ असे बोलत तो इसम घरातील कपाटाकडे गेला. मुलगी ओरडेल म्हणून तिच्या तोंडावर हात ठेवला आणि घरातून ७० हजार रुपये रोख व तीस हजार रुपयांचे दागिने घेऊन तो पसार झाल्याचे मनोहर भाडमुखे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार त्र्यंबक पोलिसांनी भा.दं.वि. ४५२, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Pimpri Trimbakala burglary; Lampas looted one lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.