स्वत:ला पेटवून घेत पिंपळदला इसमाची आत्महत्त्या
By Admin | Updated: November 10, 2014 23:48 IST2014-11-10T23:47:45+5:302014-11-10T23:48:10+5:30
स्वत:ला पेटवून घेत पिंपळदला इसमाची आत्महत्त्या

स्वत:ला पेटवून घेत पिंपळदला इसमाची आत्महत्त्या
नाशिक : स्वत:ला पेटवून घेतलेल्या टाकळी (पिंपळद) येथील इसमाचा उपचारादरम्यान सोमवारी दुपारी मृत्यू झाला़ याबाबत अधिक माहिती अशी की, चांदवड तालुक्यातील टाकळी (पिंपळद) येथील गणपत चंद्रभान टोपे (५५) यांनी सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास राहत्या घरी अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले़ यामध्ये टोपे सुमारे ९५ टक्के भाजल्याने त्यांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉ़ धूम यांनी सांगितले़ या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून या घटनेची वडनेर भैरव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)