पिंपळगावी डाळिंबाला दोन हजार रुपये भाव
By Admin | Updated: August 27, 2016 23:29 IST2016-08-27T23:28:30+5:302016-08-27T23:29:14+5:30
पिंपळगावी डाळिंबाला दोन हजार रुपये भाव

पिंपळगावी डाळिंबाला दोन हजार रुपये भाव
पिंपळगाव बसवंत : येथील बाजार समितीमध्ये डाळिंबाची आवक वाढली असून बाजारभावातही सुधारणा झाली आहे. गेल्या आठवड्यापासून कोपरगाव, नाशिक, मनमाड, चांदवड, देवळा, कळवण, निफाड आदि भागातून डाळिंबाची आवक होत असून आरक्ता, शेंदरा आदि जातीचे डाळींब येत असून प्रती २० किलो कॅरेट २००० ते ४२०० पर्यंत उच्चांकी बाजारभाव शेतकऱ्याला विना आडत मिळत आहे. भारतीय बाजारपेठेत डाळिंबाची मागणी लक्षात घेता मालाची कमतरता भासत आहे. डाळिंबाला अजूनही भाव वाढण्याची शक्यता व्यापारीवर्गानी वर्तविली आहे.(वार्ताहर)