पिंपळगाव टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची तहसीलदारांशी अपमानास्पद वर्तणूक
By Admin | Updated: July 23, 2016 00:44 IST2016-07-23T00:44:02+5:302016-07-23T00:44:54+5:30
पिंपळगाव टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची तहसीलदारांशी अपमानास्पद वर्तणूक

पिंपळगाव टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची तहसीलदारांशी अपमानास्पद वर्तणूक
पिंपळगाव बसवंत : येथील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त वर्तणुकीचा सर्वसामान्य वाहनचालकांना कसा जाच सहन करावा लागतो, याचा प्रत्यय शुक्रवारी खुद्द निफाडचे तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांना आला. विशेष म्हणजे तहसीलदारांनी ओळखपत्र दाखवूनही टोल नाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना उद्धटपणे उत्तरे देऊन त्यांचे वाहन काहीकाळ अडवून धरले. अखेर तहसीलदारांनी आपली अधिकाऱ्याची भूमिका वठवत टोल नाक्यावर उपस्थित कर्मचाऱ्यांचा वाहन-चालकांशी कसे बोलावे, याचा प्रशिक्षण वर्ग घेतला.
निफाड चे तहसीलदार डॉ विनोद भामरे व पिंपळगाव बसवंतचे मंडल अधिकारी शेख हे शासकीय कामे आटोपुन नाशिकहुन पिंपळगाव बसवंत कडे येत होते. सायंकाळी ५.३० वाजता त्यांचे वाहन पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर पोहोचले. वाहन खासगी असल्याने टोल नाक्यावरील संबंधीत महिला कर्मचाऱ्यांने त्यांच्याकडे टोलची मागणी केली. तहसीलदार भामरे यांनी ओळख पत्र दाखवुनही त्यांचे वाहन काही वेळ अडवुन ठेवत आम्ही कोणत्याही अधिकाऱ्यास ओळखत नाही टोलची रक्कम भरावीच लागेल असे उध्दटपणे बोलने संबंधीत कर्मचाऱ्याने सुरु केले. अखेर तहसीलदारांनी वाहनाच्याबाहेर येऊन टोलनाक्यावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावले. मात्र त्यावेळी टोलनाक्याचा एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता.अखेर तहसीलदार सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करुन त्यांना शिकविण्यासाठी मलाच बोलवा असा निरोप ठेवुन निफाडला निघुन गेले.