पिंपळगावी दुकान सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 21:37 IST2020-06-23T21:36:03+5:302020-06-23T21:37:19+5:30
पिंपळगाव बसवंत : घरात कोरोना- बाधित असताना प्रतिबंधिक क्षेत्रातून येऊन दुकान उघडल्याने येथे दुकानाला सील ठोकण्यात आले.

पिंपळगाव येथे दुकान सील करताना मंडल अधिकारी नीळकंठ उगले, ग्रामसेवक लिंगराज जंगम व ग्रामपंचायत कर्मचारी भूषण शिंदे आदी.
ठळक मुद्देप्रशासनाने कारवाईचा बडगा
पिंपळगाव बसवंत : घरात कोरोना- बाधित असताना प्रतिबंधिक क्षेत्रातून येऊन दुकान उघडल्याने येथे दुकानाला सील ठोकण्यात आले.
शहरात कोरोना रुग्णांचा दिवसेंदिवस आकडा वाढत असून, आतापर्यंत २० बाधित शहरात आढळून आले आहे. त्यामुळे पिंपळगाव शहरात सुरक्षिततेच्या दृष्टीने कंटेन्मेंट झोन तयार करून त्या परिसरातील नागरिकांना होम क्वॉरण्टाइन केले आहे. घरात रुग्ण व स्वत:चा स्वॅब घेतला असतानादेखील प्रतिबंधित क्षेत्रामधून चोरी छुपीच्या मार्गाने येत आपली दुकाने उघडल्याने महसूल विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारात दुकाने सील केली आहेत.