पिंपळगाव हायस्कूलमध्ये आनंदमेळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 16:41 IST2018-12-27T16:40:35+5:302018-12-27T16:41:10+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी प्रस्तुत पिंपळगाव हायस्कूल च्या वार्षिक स्नेहसंमेलनास (दि. २७) आनंदमेळा या रेनोबो फेस्टिव्हलचा प्रारंभ झाला असून, सकाळी पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या हस्ते वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले.

पिंपळगाव हायस्कूल येथे आनंदमेळ्याचा आनंद घेताना विद्यार्थी व शिक्षक.
पिंपळगाव बसवंत : येथील निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी प्रस्तुत पिंपळगाव हायस्कूल च्या वार्षिक स्नेहसंमेलनास (दि. २७) आनंदमेळा या रेनोबो फेस्टिव्हलचा प्रारंभ झाला असून, सकाळी पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या हस्ते वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष संजय मोरे, सचिव अविनाश देशमाने, सहसचिव उद्धवराव निरगुडे, संचालक रवींद्र मोरे, भास्करराव बनकर, प्रतापराव मोरे, चंद्रभान बोरस्ते, बाळासाहेब बनकर, रामराव मोरे, नानासाहेब बोरस्ते, सोमनाथ मोरे, मुख्याध्यापक अशोक मोरे, मुख्याध्यापक मीना आहेर, एनसीसी प्रमुख डोखळे, रामराव बनकर, मुकुंद जाधव, समीर जाधव, प्रवीण पाटील, विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते.