सफाई कामगारांच्या मागण्यांचे पिंंपळगाव ग्रामपंचायतीला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 17:40 IST2019-01-07T17:39:35+5:302019-01-07T17:40:53+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीने सकारात्मक निर्णय घेऊन कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सफाई कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष राजा गांगुर्डे यांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सफाई कामगारांच्या मागण्यांचे पिंंपळगाव ग्रामपंचायतीला निवेदन
पिंपळगाव बसवंत : येथील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीने सकारात्मक निर्णय घेऊन कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सफाई कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष राजा गांगुर्डे यांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपळगाव बसवंत सफाई कामगाराना किमान वेतन मिळावे, कामगारांचा पि. एफ. कपात करण्यात यावा, सेवा जेष्ठतेनुसार कामगारांना कायम करण्यात यावे, सलग आठ तास कामाचे करण्यात यावे, सार्वजनिक सुट्या नियमाप्रमाणे द्याव्यात, हॅन्डग्लोज, मास्क, व इतर साहित्य मिळावे, दर सहा महिन्यांनी, कामगार कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी, करण्यात यावी व मोफत औषधोपचार केले जावेत आदी मागण्यांचा ग्रामपंचायतीने सहानुभूतीपूर्वक विचार करत कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सफाई कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष राजा गांगुर्डे, संतोष गांगुर्डे, पोपट गांगुर्डे, योगेश गायकवाड, राहुल गांगुर्डे, रमेश अहिरे, रेखा गांगुर्डे, रमाबाई बागुल आदी उपस्थित होते. (फोटो ०७ स्विपर)