अवैध व्यवसायांविरुद्ध पिंपळगावी मोर्चा
By Admin | Updated: May 31, 2016 01:02 IST2016-05-30T22:34:38+5:302016-05-31T01:02:58+5:30
अवैध व्यवसायांविरुद्ध पिंपळगावी मोर्चा

अवैध व्यवसायांविरुद्ध पिंपळगावी मोर्चा
पिंपळगाव बसवंत : येथील हनुमाननगर भागात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरुद्ध पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.
पिंपळगाव बसवंत शहरातील उंबरखेड रोडवरील हनुमाननगर, वाघले वस्ती आदि भागात अनेक दिवसांपासून दररोज अवैधरीत्या दारूविक्री तसेच जुगाराचे अड्डेही सुरू असल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या ठिकाणी हाणामारीचे प्रकारही झाले आहेत. याविरुद्ध येथील महिलांनी एकत्रित येऊन पिंपळगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यापूर्वी शहरातील अंबिकानगर भागातील आदिवासी महिलांनी अशाच प्रकारचा मोर्चा काढून दारूविक्री बंद करण्याची मागणी केली होती व त्यानंतर त्या भागातील दारूविक्री बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता हनुमाननगरच्या महिलांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना निवेदन दिले.
या मोर्चात युवा सेनेचे नीलेश पाटील, राजा गांगुर्डे, शरद सोनवणे, लीलाबाई पवार, संगीता जाधव, सुमन गवे, अनिल गांगुर्डे, संजय शिंदे, राहुल गांगुर्डे सहभागी झाले.( वार्ताहर)