पिंपळगावच्या शेतकऱ्यांचा युरोप दौरा

By Admin | Updated: June 27, 2014 00:18 IST2014-06-26T22:04:21+5:302014-06-27T00:18:33+5:30

पिंपळगावच्या शेतकऱ्यांचा युरोप दौरा

Pimpalgaon farmers' tour of Europe | पिंपळगावच्या शेतकऱ्यांचा युरोप दौरा

पिंपळगावच्या शेतकऱ्यांचा युरोप दौरा


पिंपळगाव बसवंत : येथील शेतकरी व निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक रमेश किसन विधाते यांनी नुकताच युरोपमधील दहा देशांचा दौरा करून तेथील प्रगत शेती व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. या दौऱ्यात त्यांनी युरोपमधील प्रगत फूलशेती, पॉलीहाऊसमधील फळे, भाजीपाला याबाबत माहिती जाणून घेतली. त्यांच्या या अभ्यास दौऱ्याबद्दल मविप्रचे संचालक दिलीप मोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माधवराव विधाते, बापूसाहेब वाढवणे, संजय देशमाने, शशिकांत मोरे, राजेंद्र निरगुडे, राजेंद्र विधाते, नारायण पोटे आदि उपस्थित होत.

Web Title: Pimpalgaon farmers' tour of Europe