पिंपळगावच्या डॉक्टर दाम्पत्यास सक्तमजुरी

By Admin | Updated: September 4, 2016 01:39 IST2016-09-04T01:33:40+5:302016-09-04T01:39:07+5:30

गर्भलिंगनिदान : जिल्ह्यातील पहिलीच शिक्षा

Pimpalgaon doctor Doctor Dakatamajuri | पिंपळगावच्या डॉक्टर दाम्पत्यास सक्तमजुरी

पिंपळगावच्या डॉक्टर दाम्पत्यास सक्तमजुरी


नाशिक : गर्भलिंगनिदानास कायद्याने बंदी असताना गर्भलिंगनिदान करणारे पिंपळगाव बसवंत येथील डॉ. अरुण दौलत पाटील आणि डॉ. शोभना अरुण पाटील या दाम्पत्यास पिंपळगाव (ब.) येथील न्यायाधीश एम. आर. सातव यांनी शनिवारी (दि़३) गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदानतंत्र (गर्भलिंग निवड प्रतिबंधक) कायदा १९९४ सुधारित २००३ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली़
निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील डॉ़ अरुण व शोभना पाटील यांच्या क्लिनिकमध्ये गर्भलिंगनिदान केले जात असल्याची तक्रार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ६६६.ेंूँ्रे४’ॅ्र.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर २०१२ मध्ये प्राप्त झाली होती़ या तक्रारीनुसार शासनाच्या एका समितीने या ठिकाणी छापा टाकून कागदपत्रांची पाहणी केली होती़ समुचित अधिकारी डॉ़ प्रल्हाद गुठे यांनी क्लिनिकमधील आढळलेल्या त्रुटींच्या आधारे त्यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता़
पीसीपीएनडीटी कायद्यान्वये दाखल झालेल्या या गुन्ह्याचा खटला पिंपळगाव बसवंत येथील न्यायाधीश एम़ आऱ सातव यांच्या न्यायालयात सुरू होता़ विशेष सरकारी वकील अ‍ॅड़ स्वाती कबनुरकर यांनी या खटल्यात सक्षमपणे सरकारची बाजू मांडून पुरावे सादर केले़ या पुराव्यानुसार डॉ़ अरुण व शोभना पाटील यांना दोषी ठरविण्यात येऊन तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली़ दरम्यान, पाटील दाम्पत्यावर दोषारोप पत्र ठेवल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने दोन्ही वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी खटल्याच्या अंतिम निकालापर्यंत निलंबित केली होती.

-

Web Title: Pimpalgaon doctor Doctor Dakatamajuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.