शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव बसवंतला दाेघांना बसने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 01:31 IST

बेदरकारपणे बस चालविणाऱ्या बस चालकाने मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन युवकांना चिरडल्याची घटना पिंपळगाव बसवंत येथे घडली आहे. त्यातील शिवाजीनगर येथील वैभव राजेंद्र दायमा वय (२४) यांचा जागीच मृत्यू झाला, तर राकेश बाळासाहेब वाघाले हा गंभीर जखमी झाला आहे. सोमनाथ गायकवाड थोडक्यात बचावला.

ठळक मुद्देएकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

पिंपळगाव बसवंत : बेदरकारपणे बस चालविणाऱ्या बस चालकाने मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन युवकांना चिरडल्याची घटना पिंपळगाव बसवंत येथे घडली आहे. त्यातील शिवाजीनगर येथील वैभव राजेंद्र दायमा वय (२४) यांचा जागीच मृत्यू झाला, तर राकेश बाळासाहेब वाघाले हा गंभीर जखमी झाला आहे. सोमनाथ गायकवाड थोडक्यात बचावला.सदर घटना रिलायन्स पेट्रोल पंप मुंबई महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर शुक्रवारी (दि. २९) सकाळी ६.३० वाजता घडली. घटनेनंतर बसचालक फरार झाला असून, चालकाविरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंपळगाव शहरातील वैभव, राकेश, सोमनाथ हे नित्यक्रमाने शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकवर निघाले असता, रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून येणाऱ्या बसने भरधाव येत तिघांना जोराची ठोकर मारली. जखमी अवस्थेत असणाऱ्या दोघांना दवाखान्यात न नेता, बस चालक बस घेऊन फरार झाला. या अपघातात परिसरातील शिवाजीनगर, कोळीवाडा येथे राहणाऱ्या वैभव दायमा या युवकाला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला, तर राकेश वाघाले गंभीर जखमी असून, सोमनाथ गायकवाड हा थोडक्यात बचावला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंडित वाघ व योगेश बुरगुले करत आहेत.अनेकांचा जीव वाचला...  अज्ञात बस चालक अपघात करून फरार होत असताना, अत्यंत भरधाव वेगाने बस नेत असल्याने मॉर्निंग वॉक  व मोटारसायकलवर जाणाऱ्या इतर अनेकांचा जीव टांगणीला होता. घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता, पोलिसांनीं या बस चालकाचा शोध घेत चालकावर कारवाई करावी, अशी  मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू