पिंपळगाव बसवंत : बाजारभावातही सुधारणा
By Admin | Updated: August 10, 2016 22:34 IST2016-08-10T22:29:12+5:302016-08-10T22:34:37+5:30
डाळिंबाची आवक वाढली

पिंपळगाव बसवंत : बाजारभावातही सुधारणा
पिंपळगाव बसवंत : येथील बाजार समितीमध्ये डाळिंबाची आवक वाढली असून, बाजारभावातही सुधारणा झाली आहे.
पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या आवारात गेल्या आठवड्यापासून कोपरगाव, नाशिक, मनमाड, चांदवड, देवळा, कळवण, निफाड आदि भागातून डाळिंबाची आवक येत असून, आरक्ता, शेंदरा आदि जातीची डाळींब येत असून, प्रति २० किलो क्रेट १९०० ते २००० पर्यंत बाजारभाव शेतकऱ्याला विनाअडत मिळत आहेत. भारतीय बाजारपेठेत डाळिंबाची मागणी लक्षात घेता मालाची कमतरता भासत आहे. डाळिंबाला अजूनही भाव वाढण्याची शक्यता व्यापारीवर्गाने वर्तवली असून, व्यापारी कैलास निरगुडे, दौलतराव महाडिक, नंदू देशमाने, सुधीर गवळी, दिलीप राठी आदिंसह अनेक व्यापारी डाळिंबाची खरेदी करत आहेत. (वार्ताहर)