पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात होम क्लोरोंटाईनचे दोन गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 17:29 IST2020-03-30T17:29:21+5:302020-03-30T17:29:44+5:30
पिंपळगाव बसवंत : होम क्लोरोंटाईनचे दिलेले आदेश झुगारुन गावात वावरत असल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात दोन गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात होम क्लोरोंटाईनचे दोन गुन्हा दाखल
पिंपळगाव बसवंत : होम क्लोरोंटाईनचे दिलेले आदेश झुगारुन गावात वावरत असल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात दोन गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
पिंपळगाव बसवंत शहरात गेली पाच दिवसापासुन पोलीसांनी कडक वातावरण निर्माण केले असुन शहरातील किराणा.मेडीकल .भाजीपाला वगळता सर्वच बंद ठेवण्यात आले आहे शहरातील मध्य वस्तीतील भाजीपाला मार्केट ग्रामपंचायत व पोलीस ठाणे प्रशासनाने शहरातील पाच ठिकाणी विभागुन भाजीपाला मार्केट भरविले असुन शहरात विविध नगरात जवळपास 130 नागरीक विविध शहरातुन आले असुन त्यांच्या आरोग्य तपासणी करन्यात आले असुन या पैकी पंधरा नागरीकांना होम क्लोरोंटाईन चा सल्ला देण्यात आरोग्य विभागाने सांगितले होते त्यापैकी दोन व्यक्तीनी शासनाचे व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे 288 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला गेली सहा दिवसात कुठलाही दुसरा गुन्हा दाखल झाला नसुन नियमांचे उल्लंघन केल्याने दोनच गुन्हे दाखल झाले आहे शहरात कलम 144 लागू असताना देखील व जे कोणी नियमांचे पालन करनार नाही अशा व्यक्ती वर गुन्हा दाखल करन्याचा ईशारा पो.नि.संजय महाजन यांनी दिला आहे.