पिंपळगाव बसवंत आगारात इंधन बचत कार्यक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 17:51 IST2019-01-17T17:51:39+5:302019-01-17T17:51:52+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील एसटी बस आगारात इंधन बचत कार्यक्र म संपन्न झाला.

पिंपळगाव बसवंत आगारात इंधन बचत कार्यक्र म
पिंपळगाव बसवंत : येथील एसटी बस आगारात इंधन बचत कार्यक्र म संपन्न झाला.
वाहन चालवताना इंधनाकडे लक्ष ठेवल्यास २० टक्के इंधनाची बचत होऊ शकते. एका वर्षात वाहनचालक ४० हजार किलोमीटर वाहन चालवतात. वर्षाला २ हजार लीटरची बचत होईल. त्यामुळे वाहन चालवताना सुरिक्षत चालवा आ िण् ा इंधनाची बचत करा असा सल्ला त्यांनी दिला.शहरातील बस आगारात सुरक्षितता व जनजागृती मोहीम कार्यक्र म प्रसंगी घेण्यात आलेल्या इंधन बचत प्रसंगी आगार प्रमुख संध्या जाधव बोलत होत्या. वाहनचाकांनी सुरिक्षत वाहन चालवून इंधनाची बचत केली आशा वाहनचालकांचा गौरव केला जाईल.असेही त्या म्हणाल्या.
प्रारंभी इंधन बचत समारंभाचे उदघाटन प्राचार्य गवळी यांच्या हस्ते संपन्न झाले. व उत्कृष्ट केपीटील देणारे चालकांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर ए.टी.एस गुंड, टी.आय.पवार,ए.डब्ल्यू.एस.निकाळे, ए.आय.उदार,बापू सोनवणे आदी उपस्थित होते .
सूत्रसंचालन संदीप कुयटे यांनी केले तर आभार ए.टी. गुंड यांनी मानले.यावेळी अधिकारी व बस कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.