पिंपळदर सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर
By Admin | Updated: July 25, 2016 23:38 IST2016-07-25T22:24:10+5:302016-07-25T23:38:37+5:30
पिंपळदर सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर

पिंपळदर सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर
सटाणा : तालुक्यातील पिंपळदर येथील सरपंच राजेंद्र विठ्ठल पवार यांच्याविरु द्ध अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे त्यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले.
१९ जुलै रोजी सदस्य संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली ९ पैकी ६ सदस्यांनी तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्याकडे अविश्वास ठरावावर स्वाक्षऱ्या करून अर्ज दाखल केला होता. पिंपळदर येथील सरपंच कामकाज करताना सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, मनमानी कारभार करतात, जनसुविधांचा विचार करीत नाहीत आदि अनेक कारणे देत सदस्य संदीप पवार, शरद पवार, वैशाली पवार, सोनाली पवार, मंज्याबाई बोरसे, मीराबाई पवार या सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला. या ठरावावर सोमवारी (दि.२५) ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यात राजेंद्र पवार यांच्यासह अजून दोन सदस्य गैरहजर राहिल्याने ६ विरु द्ध ० असा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.
यासाठी तहसीलदार सुनील सैंदाणे, अव्वल कारकून रवींद्र मगर, गोसावी भाऊसाहेब, तलाठी व्ही. एम. शिरसाठ आदिंनी कामकाज पाहिले. (वार्ताहर)