पिंपळद शाळेला आयएसओ मानांकन

By Admin | Updated: September 4, 2015 23:42 IST2015-09-04T23:41:39+5:302015-09-04T23:42:05+5:30

पहिलीच शाळा : पदाधिकाऱ्यांनी केले कौतुक

Pimpal school gets ISO rating | पिंपळद शाळेला आयएसओ मानांकन

पिंपळद शाळेला आयएसओ मानांकन

नाशिक : पिंपळद येथील जिल्हा परिषद शाळेने आयएसओ ९००१:२००८ हे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. हे प्रमाणपत्र मिळविणारी ती जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे.अनिल येवले यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने हे प्रमाणपत्र मिळविले असून या यशाबद्दल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेचे कौतुक केले आहे.
शाळेच्या भौतिक सुविधा तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देणे आणि दर्जेदार शिक्षण केंद्र बनण्याचा शाळेचा मानस असल्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामनाथ घोलप, गोकुळ घोलप, सरपंच अलका झोंबाड, रुपाली जाधव, प्रकाश खर्डे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी आणि अधिकारी पल्ला गाठू शकल्याचे सांगण्यात
आले. (प्रतिनिधी)

Web Title: Pimpal school gets ISO rating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.