शहीद जवान शिंदे यांचे पार्थिव देवळाली कॅम्पला

By Admin | Updated: February 15, 2016 00:27 IST2016-02-15T00:10:54+5:302016-02-15T00:27:37+5:30

आज भयाळे येथे होणार अंत्यसंस्कार

The pilgrim Devaldali Camp of Shaheed Jawan Shinde | शहीद जवान शिंदे यांचे पार्थिव देवळाली कॅम्पला

शहीद जवान शिंदे यांचे पार्थिव देवळाली कॅम्पला

नाशिक : जम्मू-काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दल व दहशतवाद्यांमधील चकमकीत शहीद झालेले चांदवड तालुक्यातील भयाळे येथील जवान शंकर चंद्रभान शिंदे यांचे पार्थिव देवळाली कॅम्प येथे ठेवण्यात आले आहे. रविवारी जम्मू-काश्मीर येथून ओझर विमानळावर सायं. ६ वा. त्यांचा पार्थिव देह आणण्यात आला. त्याठिकाणी त्यांना लष्कराचे जवान व अधिकाऱ्यांनी मानवंदना दिली. त्यानंतर त्यांचा पार्थिव देह देवळालीच्या मिलिटरी हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. सोमवारी (दि. १५) सकाळी त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
जम्मू-काश्मीरजवळील कूपवाडा जिल्ह्यातील झुनरेशी गावात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत नायक शंकर शिंदे यांना वीरमरण आले. त्यामुळे भयाळे गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, भयाळे गावात चुल पेटली नाही. त्यांच्या घरी लोकांनी सांत्वनासाठी गर्दी केली होती. शंकर शिंदे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The pilgrim Devaldali Camp of Shaheed Jawan Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.