प्रशांत खरोटे यांना पीआयआय-आयसीआरसीचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:14 IST2020-12-06T04:14:53+5:302020-12-06T04:14:53+5:30

नाशिक : चेन्नई येथील प्रेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (पीआयआय) आणि नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल कमिटी फॉर द रेड क्रॉस ...

PII-ICRC Award to Prashant Kharote | प्रशांत खरोटे यांना पीआयआय-आयसीआरसीचा पुरस्कार

प्रशांत खरोटे यांना पीआयआय-आयसीआरसीचा पुरस्कार

नाशिक : चेन्नई येथील प्रेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (पीआयआय) आणि नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल कमिटी फॉर द रेड क्रॉस (आयसीआरसी) यांच्यातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट लेख आणि छायाचित्रांसाठीचे पुरस्कार ऑनलाइन जाहीर झाले आहेत. यामध्ये नाशिक ‘लोकमत’चे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांना विशेष पुरस्कार (ॲप्रिसिएशन ॲवॉर्ड) जाहीर झाला आहे. कोरोनाच्या काळामध्ये आघाडीवर लढणारे सुपरहिरो या विषयावरील लेख आणि छायाचित्रांमधून यावर्षी निवड करण्यात आली आहे. उत्कृष्ट फोटो पुरस्कारात मानवेंद्र वसिष्ठ (पीटीआय), अश्विन प्रसाथ (न्यू इंडियन एक्स्प्रेस ) आणि रिंकू राज (मल्याळी मनोरमा) यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षी प्रथमच छायाचित्र श्रेणीमध्ये ॲप्रिसिएशन अवॉर्ड जाहीर करण्यात आला. त्यामध्ये प्रशांत खरोटे (लोकमत) यांचा समावेश आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये मानवतेला धरून पत्रकारिता करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हे पुरस्कार देण्यात येत असतात. यंदा या पुरस्कारांचे हे १४ वे वर्ष आहे.

(प्रशांत खरोटे यांचे छायाचित्र मेल केले आहे. )

Web Title: PII-ICRC Award to Prashant Kharote