तस्करीसाठी बिबट्याची हत्त्या

By Admin | Updated: July 5, 2014 00:19 IST2014-07-04T22:37:13+5:302014-07-05T00:19:50+5:30

तस्करीसाठी बिबट्याची हत्त्या

Pigeon's hand for smuggling | तस्करीसाठी बिबट्याची हत्त्या

तस्करीसाठी बिबट्याची हत्त्या

नाशिक : बिबट्याची हत्त्या करून त्याची नखे आणि दात काढणाऱ्या सहा जणांच्या टोळीला वनविभागाच्या भरारी पथकाने सुरगाणा येथून अटक केली
आहे.
नखे, मिशा आणि दातांची तस्करी करण्याच्या इराद्याने बिबट्याची हत्त्या करण्यात आल्याची बाब तपासात पुढे आली असून, या टोळीला वनकायद्यानुसार कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
सुरगाणा येथे गेल्या महिन्यात एका गुहेत मयत स्थितीत बिबट्या आढळून आला होता. या बिबट्याच्या चारही पायांचे पंजे कापून काढण्यात आले होते, तर दात आणि मिशा काढण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. वनविभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे वनविभागाने सहा जणांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना न्यायालयात उभे केले असता त्यांना कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, सुरगाणा येथीलच ही टोळी असून, बिबट्याची हत्त्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. बिबट्या ज्या निमुळत्या गुहेत शिरला होता त्या गुहेत विषारी धुराचे टेंभे टाकून नंतर गुहेतून बाहेर पडण्याचा मार्ग दगडांनी बंद करण्यात आला होता.
यात बिबट्या गुदमरून मरून पडल्यानंतर दोन दिवसांनी या टोळीने घटनास्थळी जाऊन बिबट्याची नखे, मिशा आणि दात काढून टाकले
होते.
दरम्यान, सदर कारवाई करणारे वनपरिक्षेत्रपाल जी. ए. झोले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Pigeon's hand for smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.