कांदा पीक करपू लागल्याचे चित्र
By Admin | Updated: October 6, 2014 00:15 IST2014-10-04T23:07:00+5:302014-10-06T00:15:29+5:30
कांदा पीक करपू लागल्याचे चित्र

कांदा पीक करपू लागल्याचे चित्र
पांगरी : सिन्नर तालुक्यातील धारणगाव येथे भारनियमनामुळे कांदा पीक करपू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे या परिसरात वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. धारणगाव येथे देवपूरअंतर्गत भोकणी फीडरवरून वीजपुरवठा करण्यात येतो. गेल्या काही दिवसांपासून या फीडरवर अनियमित वीजपुरवठा होत असल्याने शेतकरीवर्गात संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. भारनियमनाव्यतिरिक्त होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. चार वर्षांपासून कमी पर्जन्यमान होते. त्यामानाने यावर्षी बरा पाऊस झाला.