पिकनिक पॉर्इंट @ सोमेश्वर धबधबा !

By Admin | Updated: August 1, 2016 01:09 IST2016-08-01T01:08:54+5:302016-08-01T01:09:41+5:30

नाशिककरांनी साधली पर्वणी : रिमझिम पावसात सुटीचा मनमुराद आनंद

Picnic Point @ Someshwar Waterfall! | पिकनिक पॉर्इंट @ सोमेश्वर धबधबा !

पिकनिक पॉर्इंट @ सोमेश्वर धबधबा !

 नाशिक : धरणातील पाणी सोडल्याने ओसंडून वाहणाऱ्या सोमेश्वर धबधब्यावर नाशिककरांनी सुटीचा मनमुराद आनंद लुटत एकच धमाल केली. त्यातच दिवसभर रिमझिम पाऊस सुरू असल्याने नाशिककरांच्या आनंदात भरच पडली.
रात्रीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्याने सकाळच्या सुमारास धरणातून गोदामाईत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहत होता. नाशिककरांनी या संधीचा सहकुटुंब लाभ घेत सुट्टीचा आनंद घेतला. सकाळपासून पर्यटकांची रीघ लागली होती. दुपारी तीन वाजेनंतर पर्यटकांच्या गर्दीत भर पडल्याने पोलिसांना याभागात बंदोबस्त वाढवावा लागला. ओसंडून वाहणाऱ्या धबधब्याचे रूप कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी शेकडो हात पुढे सरसावत होते. कोणी स्वत:चे छायाचित्र काढण्यात दंग होते, तर कोणी सहकुटुंब या छोट्याशा ट्रिपचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करीत होते. रिमझिम पावसात भिजत पर्यटकांनी सुटी एन्जॉय केली. दरम्यान, रविवारच्या सुटीची पर्वणी साधून शहरातील काही नोकरदारवर्गाने कुटुंबियांसह जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह अन्य ठिकाणच्या पर्यटन स्थळांना भेट देण्याचे नियोजन केले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Picnic Point @ Someshwar Waterfall!