पिकअपची धडक; दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: July 26, 2014 00:48 IST2014-07-26T00:03:15+5:302014-07-26T00:48:21+5:30
पिकअपची धडक; दुचाकीस्वार ठार

पिकअपची धडक; दुचाकीस्वार ठार
मालेगाव : मालेगाव-सटाणा रस्त्यावर अॅरोमा थिएटरसमोर भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. मसगा महाविद्यालयातील कर्मचारी दिलीप प्रभाकर देशमुख (४८) रा. शिपाई कॉलनी हे त्यांच्या होण्डा ड्रिमने (क्र. एमएच १४ एडी ३३३४) मोसमपुलाकडे जात असताना पिकअप टेम्पोने (क्र. एमएच १४ व्ही ९४६५) त्यांना जबर धडक दिली. अपघातात दिलीप देशमुख यांच्या डोक्याला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले.
सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली होती. छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर टेम्पोचालक गाडी सोडून पळून गेला. पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.