शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकात देवेंद्र फडणवीसांचा फोटो फाडला; मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन

By धनंजय रिसोडकर | Updated: September 2, 2023 14:41 IST

जालन्यातील घटनेचे पडसाद नाशिकमध्येदेखील उमटले आहेत. शहरातील सीबीएस परिसरामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ते मेहेर सिग्नल या भागात सकल मराठा समाज तर्फे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.  

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : काल जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आक्रोश मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली होती. त्या घटनेच्या निषेधार्थ राज्यात सकल मराठा समाज आक्रमक झाला असून शनिवारी (दि. ०२) मराठा समाजाकडून या घटनेचा निषेध करत आंदोलन करण्यात आले.  नाशकातही सीबीएस परिसरात दोन संघटनांच्या माध्यमातून युवकांनी जोरदार घोषणाबाजी करत तसेच देवेंद्र फडणवीस यांचा फोटो फाडण्यासह फडणवीस आणि राज्य शासनविरोधी घोषणा देत शासनाचा निषेध केला.  

जालन्यातील घटनेचे पडसाद नाशिकमध्येदेखील उमटले आहेत. शहरातील सीबीएस परिसरामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ते मेहेर सिग्नल या भागात सकल मराठा समाज तर्फे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.  मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी राज्यसरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या विरोधातदेखील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. दुटप्पी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा समाजाच्या तरूणांनी आंदोलकांनी केली आहे.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. तसेच जालना जिल्ह्याच्या एसपींना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली. मराठा समाजाच्या भावना समजून घेऊन समाजाच्या आरक्षणाचा निर्णय तातडीने घेण्याची मागणीदेखील करण्यात आली. प्रफुल्ल वाघ, नितीन रोटे पाटील, सागर देशमुख यांच्यासह १० ते १२ कार्यकर्त्यांना सरकारवाडा पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण