फलाहारी मौनी महाराजांचा ४० दिवसीय महालक्ष्मी महायज्ञ
By Admin | Updated: August 23, 2015 23:31 IST2015-08-23T23:29:59+5:302015-08-23T23:31:10+5:30
फलाहारी मौनी महाराजांचा ४० दिवसीय महालक्ष्मी महायज्ञ

फलाहारी मौनी महाराजांचा ४० दिवसीय महालक्ष्मी महायज्ञ
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त श्री शिवयोगी मौनीजी महाराज यांनी राष्ट्राला सुखसंपत्ती लाभून आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी ४० दिवसीय ११ कुंडीय महालक्ष्मी महायज्ञाला प्रारंभ केला आहे.
औरंगाबादरोडवरील नांदूरनजीक स्वामी परमहंस धाम येथे या यज्ञाला प्रारंभ झाला असून, यात १ हजार पाठ, श्री सूक्त व ११ हजार श्री कनकधारा स्तोत्राचे पठण करून यज्ञाहुती देण्यात येणार आहे. या महापर्वणी काळात सोमवारी व प्रदोष या दिवशी ३५१ दीपप्रज्वलन केले जाणार आहे. या यज्ञाला नांदूर, पंचवटी, आडगावसह बाहेरगावचे अनेक भाविक बसले आहेत. या काळात नित्य महाप्रसाद वाटप करण्यात येत आहे. तसेच ऐश्वर्य, धनधान्यवृद्धी, आर्थिक, आत्मिक उन्नतीसाठी प्रार्थना करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)