येत्या रविवारी पाळीव प्राण्यांचा मेळा
By Admin | Updated: December 8, 2015 22:48 IST2015-12-08T22:47:26+5:302015-12-08T22:48:08+5:30
येत्या रविवारी पाळीव प्राण्यांचा मेळा

येत्या रविवारी पाळीव प्राण्यांचा मेळा
नाशिक : द नाशिक कॅनाईन क्लब, महाराष्ट्र कॅट फेडरेशन व पेट प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि.१३) ‘पेट-टुगेदर सिझन ३’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती क्लबचे निखील पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लवाटेनगर येथील ठक्कर डोम येथे सकाळी आठ वाजेपासून पाळीव प्राण्यांचा आगळा मेळा सुरू होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या या मेळाव्याला सर्व गटांतील विविध जातींच्या पाळीव प्राणी-पक्ष्यांसह राज्यभरातून सुमारे सातशे स्पर्धकांनी हजेरी लावली होती.
यंदाचा पाळीव प्राणी-पक्ष्यांचा मेळावा पुढील आठवड्यात पार पडणार आहे. सालाबादप्रमाणे यंदाही या पाळीव प्राण्यांच्या प्रदर्शनात अनेकविध श्वानांच्या प्रजातींसह मांजरी, पक्षी, रुबाबदार घोडे प्राणीप्रेमींना पहावयास मिळणार असल्याचे पंडित यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)