द्वारका येथे पेट्रोलपंपाची तोडफ ोड
By Admin | Updated: September 2, 2014 01:08 IST2014-09-01T23:51:23+5:302014-09-02T01:08:53+5:30
द्वारका येथे पेट्रोलपंपाची तोडफ ोड

द्वारका येथे पेट्रोलपंपाची तोडफ ोड
नाशिक : द्वारका परिसरातील पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना सात-आठ जणांच्या टोळक्यांनी मारहाण करून दगडफेक करीत केबिनची तोडफोड केल्याची घटना रविवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली़
या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार द्वारका सर्कलवरील बेला अॅटो सर्व्हिसेस या पेट्रोलपंपावर रविवारी रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास सात ते आठ जणांच्या टोळक्यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत दगडफे क केली़
यामध्ये या टोळक्याला थांबविण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच या टोळक्याने पेट्रोलपंपाच्या केबिनची तोडफोड केली़ अजय प्रवीणचंद मेहता (५७, युनिटी पार्क, कॅनडा कॉर्नर, विसेमळा, नाशिक) यांनी दिलेल्या फि र्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शेळके अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)