जिल्ह्यातील पेट्रोलपंप उद्या बंद
By Admin | Updated: August 10, 2014 02:02 IST2014-08-10T01:52:44+5:302014-08-10T02:02:45+5:30
जिल्ह्यातील पेट्रोलपंप उद्या बंद

जिल्ह्यातील पेट्रोलपंप उद्या बंद
नाशिक : संपूर्ण राज्यात पेट्रोल-डिझेलवर सारखाच कर असावा या मागणीसाठी नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स वेल्फेअर असोसिएशनने येत्या सोमवारी (दि़ ११) पेट्रोल-डिझेल विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे़ शासनाचा निषेध म्हणून जिल्ह्यातील ३२० पेट्रोलपंप २४ तास बंद राहणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा सचिव विजय ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़
ठाकरे यांनी सांगितले की, राज्यातील २६ शहरांमध्ये एलबीटी लागू करण्यात आला आहे़ सोन्यासारख्या चैनीच्या वस्तूवर ०़१ टक्के एलबीटी, तर जीवनावश्यक असलेल्या पेट्रोल व डिझेलवर दोन ते पाच टक्क्यांपर्यंत एलबीटी लावला जातो़ यामुळे ग्राहकांना जादादराने पेट्रोल-डिझेल विकत घ्यावे लागते़ तसेच इतर राज्यांमध्ये कमीदरात पेट्रोल मिळत असल्याने व्रिकी कमी असून, व्यवसायावरही परिणाम झाला आहे़ या सर्व गोष्टींचा विचार करून
पेट्रोल-डिझेल विक्रेत्यांची राज्य संघटना फ ामडाने १ आॅगस्टला बैठक घेतली़ या बैठकीत ११ आॅगस्टला २४ तासांचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेण्यात आला़ मुंबईत कच्च्या तेलाची आयात होत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एसएससी टॅक्स लावला जातो़ (पान २ वर)
या टॅक्समुळे डिझेल तीन रुपयांनी, तर पेट्रोल २़५० रुपयांनी महाग झाले आहे़ या तुलनेत बाहेरील राज्यात भाव कमी असल्यामुळे राज्याच्या सरहद्दीवरील पेट्रोलपंपचालकांच्या विक्रीवर मोठा परिणाम होतो़ एलबीटीऐवजी ३० पैसे प्रतिलिटर अधिभार आकारावा ज्यामुळे सर्व राज्यात सारखाच कर लागेल व किमान दोन ते सहा रुपयांपर्यंत पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होतील, असेही ठाकरे यांनी सांगितले़
पेट्रोल असोसिएशनने ११ तारखेचा लाक्षणिक संप पुकारलेला असून, यावरही शासनाने निर्णय न घेतल्यास बेमुदत बंदचा इशाही देण्यात आला आहे़ यावेळी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष शंकरराव टाकेकर, तेहसीन खान, देवीदास पालिजा, बकुळ गांधी, बापू वावरे, साहेबराव महाले आदिंसह पेट्रोलपंपचालक उपस्थित होते़(प्रतिनिधी)