मनमाड येथे पेट्रोलपंपाची तोडफोड
By Admin | Updated: October 25, 2016 23:17 IST2016-10-25T23:17:08+5:302016-10-25T23:17:47+5:30
मनमाड येथे पेट्रोलपंपाची तोडफोड

मनमाड येथे पेट्रोलपंपाची तोडफोड
मनमाड : येथील अनकवाडे शिवारातील पेट्रोलपंप व हॉटेलची लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करून नुकसान केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या प्रकरणी दोन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मनमाड-येवला मार्गावर अनकवाडे शिवारात हरमनसिंग
यांचा फौजी ढाबा व पेट्रोलपंप असून, सोमवारी रात्री जेवणाच्या कारणावरून एका टोळक्याने हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत लाठ्याकाठ्यांनी हॉटेल व पेट्रोलपंपावर हल्ला चढवला. अचानक घडलेल्या घटनेमुळे पंपावरील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरून पळापळ सुरू झाली. पंपाची तोडफोड करून टोळके पसार झाले.
याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पुंडलीक सपकाळे पथकासह घटनास्थळावर दाखल झाले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र पाटील हे करत आहेत. दरम्यान, सदर घटनेमुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. पेट्रोलपंपावर दरोडा टाकून लूटमार झाली असल्याची चर्चा सकाळपासून परिसरात सुरू होती. या घटनेत तोडफोड करण्यात आली असून, लूटमार झाली नसल्याचे पोलीस निरीक्षक पुंडलीक सपकाळे यांनी सांगितले. (वार्ताहर)