जलचिंतन फेरविचार याचिका दाखल करणार
By Admin | Updated: October 31, 2015 00:15 IST2015-10-31T00:14:27+5:302015-10-31T00:15:09+5:30
जलचिंतन फेरविचार याचिका दाखल करणार

जलचिंतन फेरविचार याचिका दाखल करणार
नाशिक : मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याच्या उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या संदर्भात आता जलचिंतन संस्थेच्या वतीने फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राजेंद्र जाधव यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणात पुरेसा साठा नसल्याने पाणी सोडू नये, अशी भूमिका यापूर्वीच जलचिंतन संस्थेने घेतली होती. उच्च न्यायालयात यासंदर्भात जलचिंतननेही याचिका दाखल केली होती. शुक्रवारी उच्च न्यायालयाने मराठवाड्यास पाणी सोडण्यासाठी मुभा दिल्याने आता या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.