महोत्सवात पेठच्या रानभाज्यांचाच बोलबाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:17 IST2021-08-13T04:17:37+5:302021-08-13T04:17:37+5:30
आयुर्वेदात सर्वाधिक पौष्टीक समजल्या जाणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व शहरी भागातील जनतेला कळावे, यासाठी कृषी विभागाच्यावतीने गुरुवारी (दि. १२ ) ...

महोत्सवात पेठच्या रानभाज्यांचाच बोलबाला!
आयुर्वेदात सर्वाधिक पौष्टीक समजल्या जाणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व शहरी भागातील जनतेला कळावे, यासाठी कृषी विभागाच्यावतीने गुरुवारी (दि. १२ ) आयोजित केलेल्या नाशिक जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात पेठ तालुक्यातील महिला बचत गटासह महिलांनी रानभाज्या सादर केल्या.
यामध्ये कोवळ्या बांबूपासून तयार करण्यात येणारी वासत्या, टेहरा,करटूले, माठ, शेवळा,चाईचा मोहर, वाथरटा, वाघोटा यांसह जवळपास १० प्रकारच्या रानभाज्यांपासून तयार केलेले ५० प्रकारचे पदार्थ चवीसाठी ठेवण्यात आले होते. कृषी मंत्री दादा भुसे यांनी उद्घाटन कार्यक्रमानंतर पेठ तालुक्याच्या रानभाज्या दालनाला भेट देऊन माहिती जाणून घेतली.
तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनात जवळपास ५० रानभाज्यांचे प्रकार प्रत्यक्ष तयार करून चवीसाठी व विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये मंडळ कृषी अधिकारी मुकेश महाजन, श्रीरंग वाघ यांच्यासह कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक व महिला बचत गट प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.
फोटो- १२ पेठ रानभाज्या
जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात पेठ तालुका दालनची पाहणी करताना कृषी मंत्री दादा भुसे समवेत तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे.
120821\12nsk_11_12082021_13.jpg
फोटो- १२ पेठ रानभाज्या जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात पेठ तालुका दालनची पाहणी करतांना कृषी मंत्री दादा भूसे समवेत तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे.