पेठला आज आदिवासी गौरव दिन

By Admin | Updated: August 9, 2014 00:49 IST2014-08-08T23:46:00+5:302014-08-09T00:49:02+5:30

पेठला आज आदिवासी गौरव दिन

Pethla Adivasi Gaurav Day is today | पेठला आज आदिवासी गौरव दिन

पेठला आज आदिवासी गौरव दिन

पेठ : आॅगस्ट क्रांतिदिनाच्या निमित्ताने मागील वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात ९ आॅगस्ट दिवस आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येत असून, पेठ तालुक्यात या दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे़
सद्या महाराष्ट्रात धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा गाजत असून, याला अनु़जमातीचा तीव्र विरोध आहे़ याच पार्श्वभूमीवर आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने आदिवासी तालुक्यातील जनता एकत्र येणार आहे़ पेठच्या हुतात्मा स्मारकापासून सकाळी फेरी काढण्यात येणार असून, तहसील कार्यालय, बलसाडरोडवरून ही फेरी पंचायत समिती आवारात येईल़ यावेळी विविध आदिवासी नृत्य सादर करण्यात येणार आहे़ तालुक्यातील सर्व आदिवासी स्वयंसेवी संस्थांचा यात सहभाग आहे़ तसेच सर्व राजकीय पक्ष, सरकारी व निमसरकारी कर्मचारी अधिकारी यात सहभागी होतील़ (वार्ताहर)

Web Title: Pethla Adivasi Gaurav Day is today